धाराशिव (प्रतिनिधी)-हात उसने दिलेले पैसे परत मिळत नसल्यामुळे एकाने रिव्हॉलव्हरने गोळी झाडून खून केल्याची घटना भूम तालुक्यातील पाटसांगवी येथे घडली होती. या प्रकरणी आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

पाटसांगवी येथील बाबा उस्मान पटेल (34) याने दस्तगीर जिलानी पटेल यास हात उसने पैसे दिले होते. परंतु पटेल याच्याकडून पैसे परत मिळत नसल्यामुळे 29 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास दोघांमध्ये प्रचंड वाद झालो. वादाचे पर्यावसन हाणामारीमध्ये झाले. यावेळी बाबा पटेल याने त्यांच्या जवळील परवाना असलेल्या रिव्हॉलव्हरने गोळी झाडून दस्तगीर यांना ठार मारले. याप्रकरणी भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी करून न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोपत्र दाखल केले होते. याप्रकरणी भूम येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश उगले यांनी खुनासाठी जन्मठेप व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा आरोपीला सुनावली. शासकीय अभियोक्ता म्हणून गाडे यांनी कामकाज पाहिले.


 
Top