धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिवचे तालुकाध्यक्ष प्रशांत फंड यांच्यावतीने सौ. सुनेत्रा  अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दि.18 रोजी कोष्ट अंबिका मंदिर तेर  येथे नागरिक व भाविक भक्त यांना वाढदिवस व नवरात्रीचे औचित्य साधून फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी बारामती हायटेक टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सौ सुनेत्रा पवार  यांना उदंड आयुष्य लाभो अशी अंबिका माता चरणी प्रार्थना केली.

यावेळीतालुकाध्यक्ष प्रशांत फंड, ग्रा.प.सदस्य अमोल कसबे,  विद्यार्थी तालुका सचिव सागर गाढवे, अमोल फंड, बाळासाहेब फंड, संतोष देशमुख, अमोल भातभागे, सज्जाद पटेल उपस्थित होते.


 
Top