धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे 11 ऑक्टोबर पासून छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करत आहे.  

धाराशिव येथे दि. 22 ऑक्टोबरला सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक होणार आहे. तरी नागरिकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली दस्तावेज समिती पुढे सादर करावीत असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केली आहे.


 
Top