तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथे आशा स्वयंसेविका यांच्या वतीने बालविवाह मुक्त या विषयावर जनजागृती केली.                      

धाराशिव तालुक्यातील तेर येथील शिव नरसिंह नवरात्र महोत्सवात बालविवाह मुक्त या विषयावर आशा स्वयंसेविका यांनी माहिती दिली.यावेळी गजर स्त्रीशक्तीचा 21 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मुलाचा किंवा मुलीचा विवाह करू नये याबाबत सविस्तर माहिती उपस्थित देवीभक्त यांना देण्यात आली . यावेळी आशा स्वयंसेविका रेखा पांगरकर, कविता आंधळे, मीरा गाढवे ,पौर्णिमा झाडे, राणी शिराळ यांनी  उपस्थिताना माहिती दिली.


 
Top