तेर (प्रतिनिधी)- नांदेड येथे झालेल्या शालेय क्रीडा विभागीय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालय येथील दोन विद्यार्थ्यांनीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

17  वर्षा खालील गटात वैष्णवी माने हीने 81 किलो वरील वजन गटात तर पायल बंडे हीने 81 किलोच्या  खालील वजन गटात विजय संपादन केल्याबद्दल राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय साठी निवड राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवडीबद्दल विजयी खेळाडूचे मुख्याध्यापक जे. के बेदरे यांनी अभिनंदन केले.खेळाडूना क्रीडा प्रशिक्षकअजिंक्य वराळे, योगेश माने यांचे मार्गदर्शन लाभले.


 
Top