नळदुर्ग (प्रतिनिधी)-श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना नळदुर्ग संचलित गोकुळ शुगर्सचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या वेळी बोलताना चव्हाण  म्हणाले की, पाऊस कमी पडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे, आताच विहिरीचे पाणी आटल्याने कारखाना प्रशासनाने वेळेत कारखाना चालू करून शेतकऱ्यांचा ऊस वेळेत आणावा, असे सांगितले. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. सत्यनारायण पूजा अजिंक्य चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली.  होमहवन पूजा जनरल मॅनेजर अशोक खेन्दाड व त्यांच्या पत्नी सौ पुष्पा खेन्दाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोकुळ शुगर चे चेअरमन दत्ता शिंदे, तुळजाभवानीचे चेअरमन सुनील चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. तर यावेळी अधिकारी शत्रुघ्न जाधव, शहाजी पाडोळी, जुबेर पटेल, राजा सजन, श्रीशैल बचाटे, शिवाजी चव्हाण, यांच्या सह कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य वसंत रामदासी यांनी केले.


 
Top