धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील समता नगरातील पेन्शनर भवन येथे धाराशिव जिल्हा संस्कार भारतीच्या वतीने स्व. बाबा महाराज सातारकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी संस्कार भारती देवागिरी प्रांत चित्रकला विधाप्रमुख तथा जिल्हा मार्गदर्शक शेषनाथ वाघ जिल्हा कार्याध्यक्ष अनील ढगे, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हासचिव प्रभाकर चोराखळीकर, जिल्हा कोषप्रमुख अरविंद पाटील, जिल्हा संगीत प्रमुख सुरेश वाघमारेसुंभेकर, कलासाधक मुकुंद पाटील मेंढेकर उपस्थित होते. श्रद्धांजली कार्यक्रमात स्व. बाबामहाराज सातारकरांनी आध्यात्माचा सामाजातील स्तर वृंध्दीगत करुन हरिपाठ घरोघरी पोहचविण्यात मोलाचा वाटा आहे असे अनील ढगे व मुकुंद पाटील यांनी मनोगत केले.