परंडा (प्रतिनिधी)- येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथील इयत्ता बारावी विज्ञान वर्गाचा विद्यार्थी तथा परंडा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष बाशा शहबर्फीवाले यांचे चिरंजीव मोहम्मद कैफबाशा शहाबर्फीवाले याचा एमबीबीएस या वैद्यकिय कोर्स साठी हैदराबाद येथे प्रवेश झाल्याने महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य सुनील जाधव  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सांस्कृतीक विभागाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ सुनिल जाधव वरिष्ठ प्राध्यापक डॉ एच.एम गायकवाड गणित विभाग प्रमुख डॉ विद्याधर नलवडे कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख प्रेरणा शाळेचे शिक्षक शरद झोंबाडे देशमाने  बावची विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायन खैरे आदि उपस्थित होते . सत्कार समारंभाप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा केशव सेटे प्रा विजय जाधव प्रा संतोष भिसे प्रा शंकर कुटे प्रा प्रताप घुटे प्राध्यापिका सौ किर्ती पायघन (नलवडे) प्रा प्रतिभा माने आणि कैफबाशा शहाबर्फीवाले उपस्थित होते . मोहम्मद कैफबाशा शहाबर्फीवाले याच्या या यशस्वीते बदल परंडा शहरातील व तालुक्यातील अनेक शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.


 
Top