धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील देवकुरळी येथे दि.08 आक्टोंबर 2023 रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.
देवकुरळी येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 310 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 70 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे सरपंच हनुमंत जाधव, चेअरमन व संयोजक अदिनाथ जाधव, बाळासाहेब खलाटे, ब्रम्हानंद जाधव, अभिजित जाधव, श्रींकात जाधव, रगुनाथ जाधव, आण्णासाहेब जाधव, सुभाष राऊत, परमेश्वर जाधव, राजकुमार जाधव, अमोल जाधव, राहुल खलाटे इत्यादी ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. श्रुती सांगवी, डॉ. धनवी पारेख, डॉ. दृष्टी शहा, डॉ. रिया जैन, डॉ. श्रेया कातीरा यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे देवकुरळी उपकेंद्राच्या आशा कार्यकर्त्या सोनाली नवगीरे, सुनंदा मसके यांनी परिश्रम घेतले.