धाराशिव (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दि. 15  ते 30 ऑक्टोबर 2023 पावेतो साजरा होत आहे. दि. 28 ऑक्टोबर 2023 रोजी कोजागीरी पौर्णिमा व दि. 29 ऑक्टोबर 2023 रोजी मंदिर पौर्णिमा निमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक पायी येत असतात. नवरात्र महोत्सव कालावधीत तुळजापूर शहर व परिसरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी  होते. अशा वेळी वाहतुकीची कोंडी होवु नये, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये या करीता भाविक पायी चालत येणारे मार्गावरील वाहने अन्य मार्गाने वळविणे आवश्यक असल्याचे निर्देशनास आल्याने दि. 26 ऑक्टोबर 2023 रोजीचे 00:01 ते दि. 29 ऑक्टोबर 2023 रोजीचे 24:00 वा. दरम्यान खालील मार्गावरुन पथक्रमण करण्यास सर्व प्रकारच्या वाहनास मनाई करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर ते हैद्राबाद कडे जाणाऱ्या वाहतुकीला धाराशिव पासुन तुळजापूर व पुढे नळदुर्ग पर्यंत मनाई करण्यात येत आहे,  हैद्राबाद ते छत्रपती संभाजीनगर कडे येणाऱ्या वाहतुकीला नळदुर्ग पासुन तुळजापूर व पुढे धाराशिव पर्यंत मनाई करण्यात येत आहे, लातुर से सोलापूर कडे जाणान्या वाहतुकीला औसा पासुन तुळजापूर व तामलवाडी  पुढे सोलापूर पर्यंत मनाई करण्यात येत आहे, सोलापूर ते लातूर कडे येणाऱ्या वाहतुकीला सोलापूर पासून तामलवाडी तुळजापूर पुढे औसा पर्यंत मनाई करण्यात येत आहे,छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर कडे जाणाऱ्या वाहतुकीला येरमाळा पासून धाराशिव तुळजापूर तामलवाडी व पुढे सोलापूर पर्यंत मनाई करण्यात येत आहे, सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर कडे येणाऱ्या वाहतुकीला सोलापूर पासून तामलवाडी तुळजापूर धाराशिव व पुढे येरमाळा पर्यंत मनाई करण्यात येत आहे, तुळजपूर ते बार्शी कडे जाणाऱ्या वाहतुकीला तुळजापूर पासून ढेकरी गौडगाव व पुढे बाशी पर्यंत मनाई करण्यात येत आहे, बार्शी ते तुळजापूर कडे येणाऱ्या वाहतुकीला बार्शी पासुन गौडगाव ढेकरी व पुढे तुळजापूर पर्यंत मनाई करण्यात येत आहे,

या मार्गावरील वाहने खालील प्रमाणे मार्गक्रमण करतील.

छत्रपती संभाजीनगर ते हैद्राबाद कडे जाणारी वाहतुक छत्रपती संभाजीनगर बीड मांजरसुंबा - अंबाजोगाई लातूर औसा उमरगा मार्गे पुढे हैद्राबादकडे पदक्रमण करतील. किंवा छत्रपती संभाजीनगर बीड येडशी ढोकी मुरुड लातूर औसा उमरगा मार्गे पुढे हैद्राबादकडे पचक्रमण करतील,हैद्राबाद ते छत्रपती संभाजीनगर कडे येणारी वाहतुक उमरगा औसा लातूर अंबाजोगाई  मांजरसुंबा बीड मार्गे पुढे छत्रपती संभाजीनगर कडे पदक्रमण करतील,किंवा उमरगा औसा लातूर मुरुड ढोकी येडशी बीड मार्गे छत्रपती संभाजीनगर  कडे पथक्रमण करतील,

 धाराशिव ते सोलापूर कडे जाणारी वाहतुक वैराग मार्गे पथक्रमण करतील, सोलापूर ते धाराशिव कडे येणारी वाहतुक वैराग मार्ग पथक्रमण करतील, लातूर ते सोलापूर कडे जाणारी वाहतुक मुरुड पासुन ढोकी येडशी बार्शी पुढे सोलापूर  या मार्ग पथक्रमण करतील, सोलापूर ते लातुर कडे येणारी वाहतुक सोलापूर पासुन बार्शी येडशी ढोकी मुरुड - पुढे लातुर या मार्गे पथक्रमण करतील, छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर कडे जाणारी वाहतूक येरमाळा पासून बार्शी पुढे सोलापूर या मार्ग पथक्रमण करतील, सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर कडे येणारी वाहतुक सोलापूर पासुन बार्शी पुढे येरमाळा या मार्गे पथक्रमण करतील, तुळजापूर ते बार्शी कडे जाणारी वाहतुक तुळजापूर धाराशिव पुढे बाशी या मार्गे पथक्रमण करतील.

बार्शी ते  तुळजापूरकडे येणारी वाहतुक बार्शी वैराग धाराशिव पुढे तुळजापूर मार्ग पचक्रमण करतील, तुळजापूर ते सोलापूर कडे जाणारी वाहतुक मंगरुळ पाटी पासून इटकळ बोरामणी पुढे सोलापूर या मार्गे पथक्रमण करतील,सोलापूर ते तुळजापूर कडे येणारी वाहतुक सोलापूर पासून बोरामणी इटकळ मगरूळ पाटी  पुढे तुळजापूर या मार्गे पचक्रमण करतील,

वरील बंधने ही पोलीस, रूग्ण सेवा, अग्निशमन दलाच्या वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहने व एस. टी. बसेस या वाहनांना लागू राहणार नाहीत, तथापी दि. 26 ऑक्टोबर 2023 रोजीचे 00:01 वा ते दि. 29 ऑक्टोबर 2023 रोजीचे 24:00 या दरम्यान तुळजापूर घाट हा सर्व प्रकारचे वाहतुकस बंद असेल.


 
Top