तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवात मंदिर परिसरात नारळ फोडणीवर बंदी असताना बुधवारी राजमाता माँ जिजाऊ महाध्दार समोर मोठ्या संख्येने नारळ फोडले गेल्याने या महाध्दारवर सर्वञ दलदल होवुन निसरडे तयार झाले होते. यावरुन अनेक भाविक घसरुन पडल्याचे समजते.
श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सव काळात मंदिर समोर सोललेले नारळ फोडणे बंदी असताना. या भागात मोठ्या संख्येने पोलिस असताना बुधवारी सांयकाळी व गुरुवारी सकाळ पर्यत येथे मोठ्या प्रमाणात नारळ फोडल्याने येथे सर्वञ नारळातील पाणीच पाणी झाले होते. अनवाणी पायाने येणारा भाविक यामुळे घसरुन पडत होते. पाण्यामुळे राजमाता माँ जिजाऊ महाध्दार परिसर निसरडा बनला होता.