परंडा (प्रतिनिधी)- येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ विभागाचे मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. हरिश्चंद्र गायकवाड,कनिष्ठ विभागाचे इंग्रजी विभागाचे निवृत्त माजी पर्यवेक्षक  प्रा.दत्तात्रय मांगले यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ. शहाजी चंदनशिवे, कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब दिवाणे, डॉ. गजेंद्र रंदील, प्रा. शंकर कुटे, प्रा.दीपक हुके, प्रा तानाजी फडतडे, वरिष्ठ लिपिक बाबासाहेब क्षिरसागर, शिक्षकेतर कर्मचारी बबन ब्रह्मराक्षस, संतोष राऊत, उत्तम माने, भागवत दडमल यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन प्रा.डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले तर प्रो. डॉ. हरिश्चंद्र गायकवाड यांनी आभार मानले.


 
Top