तुळजापूर ( प्रतिनिधी ) - श्री तुळजाभवानी मातेचे ऐतिहासिक पुरातन व नित्योपचार पुजा सण समारंभासाठी लागणारे सोन्याचे दागिने वितळवणार नसुन फक्त 2009 ते 2023 या कालावधीत भाविकांनी अर्पण केलेले सोने इन कँमेरा शासन निर्दशाप्रमाणे वितळविण्याची प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सतिश ओम्बांसे यांनी दिली.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोने दागिने वितळवण्यास विधी व न्याय विभागाने मंजुरी दिली असून लवकरच ही प्रक्रिया सुरु
केली जाणार आहे. भक्तांनी 2009 पासून 2023 पर्यत भक्तांनी अर्पण केलेले 200 किलो सोने असुन त्यातुन 55 ते 60 टक्के शुध्द सोने प्राप्त होण्याची शक्यता आहे. सदरील सोने जी सरकारी बँक हाय रेट व्याज देईल त्या बँकेच्या गोल्ड बाँन्ड योजनेत ठेवण्याचा विचार आहे, सदरील सोने वितळवणे प्रक्रिया नवराञोत्सव संपल्यानंतर सिध्दीविनायक शिड्री येथे समिती पाठवुन तेथील पध्दतीची माहीती घेऊन नंतरच इन कँमेरा पारदर्शक पणे शासन निर्दशानुसार सोने वितळवणे प्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगितले. सोने वितळवणे ही प्रक्रिया विश्वस्तांनी घेतलेल्या निर्णय नुसारघेतल्याचे स्पष्ट केले.