तुळजापूर (प्रतिनिधी) - छञपती शिवाजी महाराज यांचे श्रध्दास्थाने असलेले तिर्थक्षेञ तुळजापूर ते तिर्थक्षेञ शिंगणापुर रस्ता  करण्यासाठी शिव व अंबाबाई भक्त हे घटस्थापने पासुन तिर्थक्षेञ तुळजापूर ते तिर्थक्षेञ शिंगणापूर रस्ता  कामास मंजुरी देण्यासाठी पायी कावड याञा काढली जाणार असल्याची माहिती संयोजक संजय कोकाटे यांनी शुक्रवार दि. 6 ऑक्टोबर रोजी पञकार परिषद घेवुन दिली.                                   

यावेळी पञकारांशी बोलताना कोकाटे पुढे म्हणाले कि तिर्थक्षेञ पंढरपूर ला जाण्यासाठी अनेक रस्ते  पालखी मार्ग  बनवले आहेत. माञ छञपती शिवाजी महाराज यांचे नाव घेवुन राजकारण करणारे पक्ष छञपती शिवाजीमहाराज यांचे श्रध्दास्थान असलेली श्रीतुळजाभवानी व शंभुमहादेव या तिर्थक्षेञांना जोडणा-या रस्ता  बाबतीत कुठलीही मागणी करीत नाहीत हे दुर्दवी आहे. हा रस्ता 117 किलोमीटरचा असुन यासाठी हजारो कोटी खर्च येणार आहे यात फक्त पन्नास किलोमीटर भूसंपादन करावे लागणार आहे. यातील पन्नास किलोमीटर रस्ता तयार आहे.  असे यावेळी स्पष्ट केले.  शेवटी  विशाल रोचकरी यांनी आभार मानले.


 
Top