धाराशिव (प्रतिनिधी)- ए आय सी टी ई- एम आय सी विद्यार्थी  नियोजित उपक्रमामध्ये तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव येथील महाविद्यालय स्तरावर समाज उपयोगी नवकल्पना घेऊन महाविद्यालयाची 240 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रकल्पांचे परिक्षण महाविद्यालयाचे तज्ञ प्राध्यापक यांनी केले.

यावेळी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रयोगाचे परिक्षण करताना ते म्हणाले, विद्यार्थांने नेहमीच नवनवीन संकल्पना असतात, त्यामुळे देशातील सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक प्रश्नांची उत्तरे मिळतात. फक्त त्यांना व्यासपीठ मिळणे गरजेचे असते.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या नवनवीन संकल्पना पुढे आल्या. यातील काही प्रयोग निश्चितच भविष्यात पथदर्शी प्रयोग म्हणून मान्यता पावतील अशी मला आशा आहे. तसेच प्रोजेक्ट रूबी म्हणजेच ऑटोमेशन इलेक्ट्रिक स्केटबोर्ड ची कल्पना समोर मांडली. ओयायसिस द स्मार्ट वॉटर डिस्पेन्सर विथ ॲप आणि नवनवीन वैशिष्ट्ये, दिवसभर लायब्ररी उघडी ठेवण्याचा अतिरिक्त ताण लक्षात घेता लायब्ररी ऑटोमिशन लॅब ही एक नवीन संकल्पना विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रयोगातून मांडली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना नवीन  कल्पक कल्पना घेऊन बक्षिसे, प्रमाणपत्र, प्रकल्प अंमलबजावणीच्या संधी व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भाग घेण्याची संधी मिळणार असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन -2023 कॉर्डिनेटर डॉ. सुशीलकुमार नाथराव होळंबे, को कॉर्डिनेटर प्रा.रवींद्र गुरव, प्रा.डी. बी. ठाकूर, प्रा.डी. बी. भक्ते, प्रा. बालाजी चव्हाण, प्रा.व्ही. एस. बोंदर, प्रा.आर. बी. ननवरे या सर्वांनी  कार्यक्रमासाठी पूर्ण परिश्रम घेतले.


 
Top