नळदुर्ग (प्रतिनिधी)- आज दि. 1 ऑक्टोंबर 2023 रोजी कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव आणि मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड बोर्ड कास्टिंग सेंट्रल ब्युरो आप कम्युनिकेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रिय संचार ब्युरोतर्फे केंद्र शासनाच्या विविध योजना, कार्यक्रम आणि नीती- धोरणाबाबत विविध माध्यमाद्वारे प्रसिध्दी केली जाते. तसेच विविध विषयावरती मोठ्या स्वरूपात डिजिटल प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. सदरील योजनांवर सनियंत्रण करून केंद्र शासनास फीडबॅक दिला जातो. म्हणून दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत: “ कचरामुक्त भारत“या मोहिमेतर्गत देशातील महत्वपूर्ण व ऐतिहासिक स्थळांची सामूहिक स्वच्छता करणेबाबत केंद्र शासनाकडून सूचना प्राप्त झालेल्या होत्या. या अनुषंगाने दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9.30 ते 11 वाजेपर्यंत धाराशिव जिल्हयातील नळदुर्ग किल्यातील उपली बुरुज परिसराची स्वच्छता करण्यात आली. सदरील मोहिमे अंतर्गत महाविद्यालयातील ग्रीन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेतील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी  यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. 

महाविद्यालयाला व सहभागी शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी शिक्षकांना भारत सरकारचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच श्रमदानानंतर अल्पोपहारची सोई देखील करण्यात आली.  सदरील कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आमदार राणा जगजितसिग पाटील,  प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुभाष राठोड, उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, ग्रीन क्लब समन्वयक डॉ उद्धव भाले, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ पंडित गायकवाड, एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा बाबासाहेब सावते, राष्ट्रीय छात्र सेना समन्वयक लेफ्टनंट डॉ अतिश तिडके, डॉ सुभाष जोगदंडे तसेच ज्यूनियर विभागातील एन एस एस कार्यक्रमाधिकारी प्रा संजय गोरे, प्रा धनंजय चौधरी .  प्रा.झरीना पठाण,डॉ.दिपक जगदाळे , प्रा.प्रशांत घाडगे तसेच श्री बारीक शिंदे श्री किरण व्हंताळकर हे उपस्थित होते. त्याचबरोबर या स्वच्छते मोहीमेसाठी ग्रीन क्लब, एन एस एस आणि राष्ट्रीय शास्त्र सेना अशी एकूण 36 विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला.

 या कार्यक्रमाचे आयोजक  विभागीय प्रसिद्धी अधिकारी श्री अंकुश चव्हाण, श्री अंबादास यादव, कृषी अधिकारी श्री सचिन चव्हाण,  मुख्याधिकारी श्री लक्ष्मण कुंभार व गावातील नागरिक, पत्रकार व मीडिया प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 
Top