धाराशिव (प्रतिनिधी)-वकील नागरी पतसंस्थेची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 30 सप्टेंबर रोजी शिवानंद हॉल धाराशिव येथे खेळीमेळीचे वातावरणात पार पडली. 

सभेचे अध्यक्ष उस्मानाबाद बार असो. चे अध्यक्ष ॲॅड. रवींद्र कदम यांनी भूषविले. वकील नागरी सह. पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड.राजेंद्र धाराशिवकर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या 3 म्हणजे धाराशिव, उमरगा, भूम या शाखेचा लेखाजोगा मांडला.संस्थेने यावर्षी 25 कोटीच उलाढाल केली असून संस्थेकडे 5 कोटी डिपॉझिट आणि 3 कोटी सभासदांना विविध गरजा भागविण्यासाठी वाटप केले आहे. संस्थेला ऑडिट वर्ग अ मिळाला आहे. या वर्षी फिरते दोन एटीएम सुरुवात करण्याचा विचार अध्यक्षांनी मांडला. संस्थेला यावर्षी 17 लाख नफा झाला आसून  संचालक मंडळाने यावर्षी 11 टक्के लाभ उंश देण्याचं ठरविले असून त्याला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. यावेळी संस्थेचे संचालक रामचन्द्र गरड, ॲड. अविनाश देशमुख, ॲड. वट्टे आणि कार्यकारी संचालक माधुरी जाधव आणि बरेच सभासद उपस्थित होते.


 
Top