धाराशिव (प्रतिनिधी)-येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख म्हणाले की, डॉ. ए .पी.जे.अब्दुल कलाम हे तामिळनाडूच्या रामेश्वरम येथील सर्वसामान्य कुटुंबात वाढलेले होते. त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केलेला होता. भारताच्या नागरी अंतराळ कार्यक्रमात आणि लष्कर क्षेपणास्त्र विकासाच्या प्रयत्नांमध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. अशाप्रकारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासावर केलेल्या कामामुळे ते भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले. अशा महान व्यक्तीचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. विद्यार्थ्यांनी अशा महान व्यक्तींची प्रेरणा घेऊन अभ्यास करावा आणि जीवणामध्ये यशस्वी व्हावे असे ते यावेळी म्हणाले.
ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रंथपाल मदनसिंह गोलवाल, ग्रंथालयातील सर्व कर्मचारी, महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.