उमरगा (प्रतिनिधी)-शहरातील कुंभारवाडा येथील श्री. क्षेत्र परमेश्वरी देवी मंदिरात प्रारंभी पहाटे पाच वाजता देवीला दुग्धाभिषेक करण्यात आले, पवन शिंदे यांच्या हस्ते तलवार पुजा करण्यात आली. प्रारंभी सकाळी साडेदहा वाजता ग्रामदैवत महादेव मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दुपारी एक वाजता तहसीलदार गोविंद येरमे व सौ. शिंदे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. देवी मंदिराचे पुजारी तुकाराम कुंभार यांनी पौरोहित्य केले. या वेळी देवी मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षा शकुंतला मोरे, किशोर शिंदे, राजेंद्र सूर्यवंशी, विठ्ठल कुंभार, राजु कुंभार, देवा जाधव, बाबा कुंभार आदींची उपस्थिती होती.


 
Top