धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप परिसर धाराशिव येथील व्यवस्थापन शास्त्र विभागामध्ये “प्रारंभ मॅनेजमेंट फेस्टिवलचे” आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक वर्षी प्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांनी सदर फेस्टिवलमध्ये चांगला प्रतिसाद दिला.  

दोन दिवस चाललेल्या या फेस्टिवलमध्ये मॅनेजमेंट इव्हेंट, सांस्कृतिक, क्रीडा  आणि “मिस्टर आणि मिस यु. डी. एम. एस. धाराशिव” अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. सदर फेस्टिवलचे संपूर्ण व्यवस्थापन हे व्यवस्थापन शास्त्र विभागातील एम.बी.ए. आणि एम.सी.ए. च्या विद्यार्थ्यांनी केलेले होते. सर्व स्पर्धेमध्ये चांगला सहभाग नोंदवणे आणि शेवटच्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी आपले ध्येय धोरण काय असले पाहिजे आणि ते कसे मिळवले पाहिजे याबद्दल स्वतःचे सादरीकरण केले.  या सर्व प्रक्रियेमधून मिस्टर यु. डी. एम. एस. म्हणून  प्रज्योत जगताप आणि मिस यु. डी. एम. एस. म्हणून अंकिता कटके यांची निवड करण्यात आली.

सदर “मॅनेजमेंट फेस्टिवलच्या” बक्षीस समारंभ प्रसंगी व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव, प्रा. सचिन बस्सैये, डॉ. विक्रम शिंदे आणि प्रा. वरून कळसे, शितलनाथ एखंडे, कु. भक्ती क्षीरसागर उपस्थित होते. 



 
Top