वाशी (प्रतिनिधी)- मानवी आहारात देशी अंड्यांना विशेष अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे. म्हणूनच देवांचे दुसरे रूप म्हणजे डॉक्टर हे देखील आजारी व्यक्तींना कायम अंडी खाण्याचा सल्ला देत असतात. शिवाय टीव्ही वरील जाहिरातीत देखील त्याच अर्थाने सांगितले जाते की संडे हो या मंडे रोज खावे अंडे म्हणूनच जागतिक अंडा दिवसाच्या निमित्ताने वाशी तालुक्यातील लाखनगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लाखनगाव आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत जिल्हा परिषद धाराशिव मार्फत चालवल्या जाणाऱ्या एकात्मिक अंगणवाडी क्र एक आणि दोन  मध्ये लाखनगाव येथील शिवतेज पोल्ट्री फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत मोफत अंड्याचे वाटप करण्यात आले . 

आपल्या दैनंदिन आहारात अंड्याचे योगदान काय, अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात शिवाय खनिजे व जीवनसत्वे असतात. शिवाय शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी अंड्याचा उपयोग होतो. ओमेगा फॅटी ऍसिड यांच्यासह अमिनो ऍसिड सारखे ताणतणाव कमी करण्यासाठी पोषक द्रव्य या अंड्याचा सेवनाने होतात. मेंदू चेतासंस्था,हृदय, केसांची निकोप वाढ त्याचबरोबर रक्तदाब  नखांची वाढ शिवाय झोप चांगली लागण्यासाठी एकंदरीत संतुलित आहारात कसा काय या अंड्याचा सामावेश होतो याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

 यावेळी मुख्याध्यापिका साधना ताम्हाणे सहशिक्षक अमोल पवार, महामुदा शेख, अलका ढेपे मॅडम, कोळी ताई, बसवेकर ताई, विशाल ढेपे यांच्यासह शालेय पोषण आहार  शिजवणाऱ्या कर्मचारी सय्यद भाभी , अख्तर  सय्यद हे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवतेज पोल्ट्री प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष सचिन नवनाथ लाखे, आप्पा भवलकर, संदीप सुदाम काशीद, काशिनाथ सुरवसे, उल्हास लाखे यांनी परिश्रम घेतले.


 
Top