धाराशिव (प्रतिनिधी)-नेतृत्व चांगले असेल तर काय होवू शकते हे धाराशिव पोलिस अधिक्षक व त्यांच्या टीमने दाखवून दिले आहे. अशा खेळातूनच खेळाचा दर्जा उंचावत असतो आणि यातूनच गुणवत्तापूर्ण खेळाडू तयार होत असतात असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले.
धाराशिव येथे बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या चार जिल्ह्यांच्या परिक्षेत्रिय विविध क्रिडा स्पर्धा 7 ऑक्टोबरपासून सुरू होत्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सभारंभ गुरूवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी अतिशय शानदार कार्यक्रमात करण्याता आला. यावेळी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, बीड पोलिस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांची उपस्थिती होती. या स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपद छत्रपती संभाजीनगर शहर यांना मिळाले आहे. तर उपविजेते पद धाराशिव पोलिस विभागास मिळाले आहे. चव्हाण यांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र, मेडल देवून खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले.
बाजीगर कहते है
यावेळी पुढे बोलताना विशेष पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी आताच झालेल्या पोलिस विरूध्द पत्रकार या रेस्सी खेच खेळामध्ये पत्रकारांचा संघ जिंकला आहे. असे सांगून चव्हाण यांनी हारकर भी जितनेवालों को बाजीगर कहते है पोलिस विभागाला बाजीगरची भूमिका सतत बजवावी लागते. कधी पत्रकारांसाठी, कधी जनतेसाठी तर कधी शासनासाठी तर कधी व्यापक समाज हित पाहून दुय्यम स्थान स्विकारत असतात अशी खंतही चव्हाण यांनी बोलून दाखवली.