उमरगा(प्रतिनिधी)-धाराशिव लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत दाम नाही तर काम चमत्कार दाखवेल व जनता काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभी राहते हे 2024 या निवडणुकीत दिसून येणार आहे. असे मत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.

शिवसेनेच्या वतीने होऊ द्या चर्चा निमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांचे प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी राज्य भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष बाबा पाटील होते.  तर मकरंद राजेनिंबाळकर, अनंत पाताडे, बाबुराव शहापुरे, बसवराज वरनाळे, बाजार समिती सभापती रणधीर पवार, दीपक जवळगे, रज्जाक अत्तार, अजित चौधरी आदींचे प्रमुख उपस्थिती होती.                               

यावेळी खा. खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, मी मोदीच्या नावाने निवडून आलो असे बोलतात मग मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी धाराशिव मतदार संघात तीन वेळा शिवसेनेचे खासदार होऊन गेले. यावेळी आमदार कैलास पाटील म्हणाले की, राज्य सरकार फोडा फोडीतून निवडून आले आहे.  केवळ खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली आहे. यावेळी बाबा पाटील, सुधाकर पाटील, यांनी आपले मनोगत केले. यावेळी विजयकुमार नागणे, सदाशिव भातागळीकर, विलास व्हटकर, विष्णू पाटील, अशोक सांगवे, जितेंद्र पोद्दार, दत्तात्रय शिंदे, पिंटू कलशेट्टी, कैलास शिंदे,  रमेश धनशेट्टी, सोमनाथ गुरव, धाराशिवचे काकडे, सिद्धाराम हत्तरगे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संगमेश्वर स्वामी तर आभार अजित चौधरी यांनी मानले.रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू होता तरी लोकांची मोठी उपस्थिती होती.


 
Top