तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर बायपास रोडवर काक्रंबा चौकाच्या रोडच्या कडेला लावलेली स्विफ्ट डिझायर कंपनीची 2,61,975 रुपये किमतीची कार चोरुन नेल्याची घटना घटस्थापना दिनी रविवार 15 ऑक्टोबर रोजी 13.40दरम्यान घडली.
याबाबतीत अधिक माहिती अशी की. अभिजीत विष्णु देडे, वय 38 वर्षे, रा. शिवाजी नगर, धाराशिव जि. धाराशिव यांची अंदाजे 2,61,975 रूपये किंमतीची स्विफट डिझायर सिल्व्हर रंगाची क्र. एमएच 46 डब्ल्यु 8116 ही दि.15.10.2023 रोजी 13.30 ते 13.40 वा. सु. तुळजापूर बायपास रोडवर काक्रंबा चौकाचे पुढे 200 फुट अंतरावर रोडच्या कडेवरुन येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशी फिर्यादी अभिजीत देडे यांनी दि.17.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.