तुळजापूर (प्रतिनिधी)-  हाडको वाहनतळा कडे जाण्याचा मार्ग असा दिशा दर्शक फलक धाराशिव रोडवर न लावल्याने वाहने नगरपरिषद अग्निशमन केद्र वाहन तळात मोठ्या संखेने लागुन  तेथुन  दर्शनार्थ मंदीरात  जाताना भाविकांना मोठी पायपीठ करावी लागत आहे. तरी हाडको वाहनतळा कडे जाण्याचा फलक धाराशिव रस्त्यावर लावुन हाडको वाहनतळ वाहनांनी भरल्या नंतर नगरपरिषद अग्निशमन केंद्र वाहनतळात वाहने उभे करण्याची मागणी ञस्त भाविक व वाहनचालकांन मधुन केली जात आहे

जिल्हाधिकारी व पोलिसअधीक्षक यांनी प्रथमच भाविकांची पायपीठ होवु नये म्हणून पाच ते सहा हजार वाहने थांबतील असे हाडको मैदानात प्रथमच वाहनतळ नवराञोत्सव करता तयार करण्याचा भाविकांच्या सोयीचा निर्णय घेतला.  माञ  हाडको मैदानात नव्याने सुरु केलेल्या हाडको वाहनतळात वाहने येण्यासाठी कुठलाही दिशादर्शक फलक न लावल्याने व पोलिसांना आधी हाडको वाहन तळ भरण्याबाबतीत कुठलीही सुचना दिली नसल्याने भाविकांचे वाहने नगरपरिषद अग्निशमन केंद्रातील वाहनतळात थेट जावुन थांबुन तेथुन भाविक  पायी चालत मंदिराकडे जाण्यासाठी मोठी पायपीठ करावी लागत असल्याने वाहनांनी येणाऱ्या भाविकांना मंदीर जवळ पडत प्रशासनाचा भाविकांची पायपीठ कमी व्हावी हा हेतु साध्य झाला का असा प्रश्न विचारला जात आहे. हाडको वाहनतळाकडे जाण्याचा मार्ग असा दिशादर्शक फलक धाराशिव रस्त्यावर न लावल्याने भाविक आपले वाहने नगरपरिषद अग्निशमन केंद्र वाहन तळात लावत आहेत. त्यामुळे मंदिरापासुन दूर असणारे वाहनतळ वाहनांनी फुल्ल व जवळ असणारे हाडको वाहन तळ वाहनां विना मोकळे मैदान बनले आहे. वाहन नसल्याने मुले या वाहनतळात क्रिकेट खेळत आहेत. विशेष म्हणजे हाडको वाहनताळात पोलिस बंदोबस्त, प्रकाश योजना, शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. माञ प्रशासनातील अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षित पणामुळे भाविकांना याचा फटका सहन करावा लागत आहे.


 
Top