तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूरात सध्या शारदीय नवराञ पार्श्वभूमीवर दुरुस्ती साफसफाई, रंगरंगोटी, बँरेकटींग आदी कामांची एकच धांदल उडाली आहे.
श्री तुळजाभवानी मातेची मंचकीनिद्रा आरंभ होताच श्री तुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांची संख्या घटते. या पार्श्वभूमीवर सध्या तुळजापूरात साफसफाई, स्वछता, रंग देणे, दुरुस्ती कामांची एकच धांदल शहारात, मंदिरात, घरोघरी सुरु झाली आहे. सध्या श्री तुळजाभवानी शारदीय नवराञ संबधित सर्व विभाग पुर्व तयारीत गुंतले आहे. दुकाने भाडे ठरवणे, माल आँर्डर देणे प्रक्रिया पुर्ण झाल. सध्या व्यापारी दुकाने दुरुस्ती, स्वछता, रंगरंगोटी करण्यात व्यस्त झाला आहे.