तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सव पार्श्वभूमीवर शुक्रवार दुपारी फायर मशीनने राजेशहाजी महाध्दार व राजमाता माँ जिजाऊ स्वछ धुतल्याने दोन्ही महाध्दार चकाकुन गेले होते. हे दोन्ही महाध्दार स्वछ धुण्यासाठी यासाठी पंधरा कामगारां झटले श्रीतुळजाभवानी मंदिरचे राजेशहाजी व राजमाता माँ जिजाऊ महाध्दार वर्षातुन दोन वेळेस पाण्याच्या फवा-याने स्वछ धुतले जातात त्यापैकी एक लवकरच सुरु होणारे शारदीय नवराञ उत्सव व दुसरे शांकभरी नवराञ उत्सव आहेत. 


 
Top