तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवातील तिसरी माळे दिनी  मंगळवार दि. 17 ऑक्टोबर रोजी देवीदर्शनार्थ मोठी गर्दी झाली होती. मंगळवार पहाटे 1 वा. चरणतिर्थ होवुन धर्मदर्शन आरंभ झाले. तर सकाळी सहा वाजता देविजीस भाविकांचे अभिषेक करण्यास आरंभ झाला. ते संपल्यावर देविजीस वस्ञोलंकार घालण्यात आले नंतर आरती करण्यात आली. श्रीतुळजाभवानी मंदिरात तात्यासाहेब भिताडे, निलेश भितांडे वतीने आकर्षक फुलांचा आरास करण्यात आली होती.

श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवातील दुसऱ्या माळे दिनी राञी मंदिर प्रांगणात नंदि वाहनवर छबिना काढण्यात आली. राञी मंदिर प्रांगणात छबिना काढण्यात आल्यानंतर देविचे महंत वाकोजीबुवा, गुरु तुकोजीबुवा यांनी प्रक्षाळ पुजा केल्यानंतर तिसऱ्या माळेच्या धार्मिक विधीची सांगता झाली.


11 तोळे सोन्याचा हार अर्पण

भोसरी, जि. पुणे येथील देविभक्त  शिवाजी आखाडे यांनी आई जगदंबेला मंगळवार  दि 17 ऑक्टोबर रोजी अकरा तोळे सोन्याचा हार अर्पण केला. यावेळी मंदीर संस्थांतर्फे त्यांचा सत्कार वित्त व लेखाधिकारी सिध्देश्वर शिंदे यांच्या हस्ते  करण्यात आला. यावेळी  पुजारी राम छत्रे लखन छत्रे उपस्थितीत होते.


 
Top