धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे (दि.17) आदरणीय सौ.सुनेत्रा अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष .मनोज जगताप यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सौ.सुनेत्रा अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदात्या तर्फे भरघोस असा प्रतिसाद पाहायला मिळाला.  रक्तदान शिबिरासाठी धाराशिव शहरातील रेणुका ब्लड बँक  यांच्यावतीने विशेष सहकार्य मिळाले. या सर्व रोग निदान शिबिरामध्ये तज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांची माहिती  शिबिरामध्ये उपस्थित नागरिकांना देण्यात आली. सर्व रोग निदान शिबिराचा लाभ वृद्ध व्यक्ती, महिला, लहान बालके यांनी घेतला.सर्व रोगनिदान शिबिरासाठी सुविधा हॉस्पिटल धाराशीव यांचे विशेष सहकार्य मिळाले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार,जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष मनोज जगताप, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड,धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे,सामाजिक न्याय सेल जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक सेल जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर,धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, धाराशिव महिला तालुकाध्यक्ष अप्सरा पठाण,सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष सुहास मेटे, तुळजापूर युवक तालुकाध्यक्ष नितीन रोचकरी, तुळजापूर तालुका उपाध्यक्ष गोविंद देवकर,धाराशिव युवक शहर कार्याध्यक्ष संदीप बनसोडे,सामाजिक न्याय सेल जिल्हा सहसचिव राजाभाऊ जानराव,युवक जिल्हा संघटक सुदर्शन करंजकर, विद्यार्थी तालुका सचिव सागर गाढवे,अनमोल शिंदे,महेश नलावडे,अमोल कसबे,विनोद अवतारे,शहाजी राऊत आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top