धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील सौ. स्नेहलता देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या प्रशालेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक एस. जी. कळकुंबे तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थी प्रतिनिधी कुमार आवटे व वस्ताद सुहाना यांची उपस्थिती होती. प्रारंभी प्रतिमेचे पूजन व रघुपती राघव राजाराम हे गीत गावून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

वक्तृत्व स्पर्धेत शिरीन शेख प्रथम, शिवानंद शिंदे द्वितीय तर सानिका लोखंडे हिने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी वैष्णवी कदम, उमेश कसबे, साक्षी पवार, शिफा शेख, श्रद्धा सूर्यवंशी, संस्कृती गाढवे यांनीही सहभाग घेतला होता. सूत्रसंचालन डी. एस. कुरळे यांनी तर आभार प्रदर्शन ए.ए.कोतवाल यांनी केले. कार्यक्रमास सहशिक्षक बी. एस. कांबळे विद्यार्थी पालक पवार, शिक्षकेतर कर्मचारी वाय. बी. कांबळे, एस. बी.मुळे, सौ. व्ही. पी. घोटकर  उपस्थित होते

 

 
Top