धाराशिव (प्रतिनिधी)-समाज कल्याण विभाग जि. प. धाराशिव व यश मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी व्यसनमुक्ती सप्ताहाची सुरुवात जिल्हा परिषद यशवंतराव सभागृह येथे करण्यात आली. तर सांगता येडाई व्यसनमुक्ती केंद्र येरमाळा येथे  रविवार दि.8 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आली. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानप्रसारक मंडळ सचिव प्रा.डॉ. अशोक मोहेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून  येरमाळा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक  विलास जाधव, यश मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप तांबारे, डॉ.आनंद गोरख मोरे, मोरे स्पेशलिस्ट हॉस्पिटल व्यसनमुक्ती केंद्र परांडा आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या  प्रतिमेस पुष्पहार घालून प्रार्थना घेण्यात आली. या कार्यक्रमात सप्ताह दरम्यान व्यसनमुक्ती कार्यात विशेष योगदान दिलेल्या मान्यवरांचा गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला. यामधील पुरस्कर्ते डॉ. आनंद मोरे, प्रा. तुषार वाघमारे, प्रा. पांडुरंग तांबारे, प्रा. महादेव उंदरे, प्रा रंजीत वरपे ,सुषमा भगत,  सुवर्णा चव्हाण, ह.भ. प. उत्तरेश्वर महाराज, प्रियंका शिंदे, प्रशांत शेळके यांचा सन्मान करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प अधिकारी गणेश परदेशी, समुपदेशक बापूराव हुलूळे व नानासाहेब देशमुख, येडाई व्यसनमुक्ती केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. संदीप तांबारे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन येडाई व्यसनमुक्ती केंद्राच्या समुपदेशक प्रियंका शिंदे यांनी केले.



 
Top