धाराशिव (प्रतिनिधी) -येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांना स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन करण्यात आले.

   सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे समन्वयक डॉ. डी. एम. शिंदे व महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top