परंडा (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रा.डॉ. तानाजीराव सावंत तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, तालुका संघटक तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष जयदेव गोफणे, वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रमुख बालाजी नेटके यांच्या उपस्थितीत तालुक्यातील आसू येथील ग्रामपंचायतींचे उपसरपंच शशिकांत खुने, शाखा प्रमुख सागर बुरुंगे, ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ माने यांच्या कार्यावर विश्वास ठेवुन ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे.
यामध्ये प्रामुख्याने माजी संरपच भारत मारकड, माजी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम मासाळ, राष्ट्रीय समाज पक्षाचे अनुरथ मारकड, मोहन वायकुळे, शिवाजी मासाळ, दशरथ मारकड, नागनाथ मारकड, बिरमल कारंडे, आण्णा मारकड, मच्छिंद्र मासाळ, कर्नाटक मारकड, अनंतराम मासाळ, हनुमंत वायकुळे, नामदेव मासाळ, बळीराम गणगे, अनिल वायकुळे, दिगंबर मारकड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे धनंजय सावंत यांनी स्वागत केले आहे.