तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेच्या नवराञोत्सव पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मंदीरातुन भवानी ज्योत प्रज्वलित करुन नेण्यासाठी सार्वजनिक नवराञोत्सव मंडळाच्या कार्यकत्यांची मोठी गर्दी  शनिवारी  झाली  होती. आठ ते दहा हजार सार्वजनिक नवराञोत्सव मंडळाच्या लाखो कार्यकर्त्यांनी मंदिरात भवानी ज्योत प्रज्वलित करुन नेल्या.

महाराष्ट्रातील  सार्वजनिक  सार्वजनिक  नवराञोत्सव मंडळाच्या शेकडो कार्यकते वाजतगाजत श्रीतुळजाभवानी मंदीरात येवुन होमकुंडा समोर भवानी  ज्योत प्रज्वलित करुन गावी जात आहे. रविवार  गावी  देवि मुर्ती प्रतिष्ठापना करतात  सध्या  सार्वजनिक नवराञोत्सव  मंडळाच्या शेकडो कार्यकत्यांनी तिर्थक्षेञ गजबजुन गेले आहे. तसेच तिर्थक्षेञ तुळजापूर कडे येणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक नवराञोत्सव मंडळाच्या कार्यकत्यांचा वावर दिसत आहेत. सार्वजनिक नवराञोत्सव मंडळ कार्यकते राञी गावातुन निघतात पहाटे श्री तुळजाभवानी मंदीरात येवुन भवानी ज्योत प्रज्वलित करुन गावी रवाना होत आहेत. भवानी ज्योत नेणा-या मंडळांचा ओघ रविवार पर्यत असाच राहणार आहे.


 
Top