तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सव पार्श्वभूमीवर टोळगे उंडाळे परिवारा कडुन सिंगापूर धर्तीवर छञपतीशिवाजीमहाराज यांच्या शिवराज्यअभिषेक सोहळ्यास 350वर्ष पुर्ण झाल्याच्या स्मरणार्थ बारा होल्ट फिक्सल लाईट माध्यमातून राजेशहाजी महाध्दार वर विद्युत रोषणाई माध्यमातून विद्युत शिवराज्य सोहळा विद्युत लाईटींग करण्यात येणार आहे यंदाच्या शारदीय नवराञ उत्सवातील शिवराज्यअभिषेकसोहळा आकर्षक विद्युत रोषणाई आकर्षण ठरणार आहे. टोळगे उंडाळे परिवार यांच्या कडुन मागील अकरा वर्षा पासुन श्रीतुळजाभवानी दोन्ही महाध्दार, मंदीर शिखरे परिसर निंबाळकर दरवाजा येथे आकर्षक अशी विद्युत रोषणाई मोफत वर्षभर साठी करुन दिली जाते.
हि विद्युत रोषणाई करण्यासाठी पंधरा कामगार आठवडा भर झटणार आहेत.यात राजेशहाजी महाध्दार वर बारा होल्ट फिक्सल लाईटींग केली जाणार आहे तर गर्भगृह शिखर व अन्य शिखरावर नवीन पध्दतीची फोरचीप एलईडी वाम प्रकारची फोक्स लाईटींग केली जाणार,असुन राञी सुध्दा दिवससारखे शिखरे या लाईटींग माध्यमातून भाविकांना दिसणार आहेत निंबाळकर दरवाजा हि फिक्सल लाईटींग ने उजळुन निघणार आहे.हे काम सेवा रुपी प्रथमता विजय उंडाळे नितीन उंडाळे सोमनाथ उंडाळे संजय उडाळे यांनी सुरु केले आता अकरा वर्ष झाले तिसरी पिढी ही सेवा देवीचरणी रूजू करीत आहेत.
आमचे वडील पुर्वी श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवात देविदर्शनार्थ येत पण येथे कशीतरी विद्युत रोषणाई केली जात असे या पार्श्वभूमीवर आपल्या कुलस्वामिनीचे मंदीर नवराञोत्सवात आकर्षक विद्युत रोषणाई ने उजळुन निघावे या हेतुन उंडाळे व टोळगे परिवार गेली अकरा वर्षा पासुन ही सेवा करीत आहे. शिवराज्य अभिषेक सोहळा विद्युत रोषणई करण्याची संकल्पना सिंगापूरला गेल्या तेथील निघालेल्या रँली तील विद्युत रोषणाई तुन सुचली व यंदा छञपतीशिवाजीमहाराज यांच्या शिवराज्य अभिषेक सोहळास 350 वर्ष पुर्ण झाल्याच्या अनुषंगाने शिवराज्य अभिषेक सोहळा देखावा विद्युत रुपात सादर करण्याचे ठरले व तो सादर केला जात आहे. हा वर्षभर पाहण्यासाठी उपलब्ध असणार असल्याची माहीती संजय टोळगे यांनी दिली.