धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील खाजा नगर भागातील नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की खाजा नगर येथील सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरलगत मोठा खडा पडला आहे त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये वर्षाच्या बारा महिने पाणी साचलेले असते प्रशासनाला तीन वर्षापासून निवेदन देऊन देखील त्या ठिकाणी काम होत नाही त्यामुळे त्याला तणाव घोषित करून मच्छीमार करण्यासाठी लिलाव करावा असे निवेदन जिल्हाधिकारी यांना खाजा नगर भागातील नागरिकांच्या वतीने दि 4 ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले आहे. 

नऊ ऑक्टोबर पर्यंत उपाययोजना न झाल्यास 9 ऑक्टोबर रोजी रस्ता रोको आंदोलन करून रोडलगत पडलेला मोठ्या खंडामध्ये पाणी साचलेल्या ठिकाणी उपासात्मक मच्छीमारो आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये देण्यात आला आहे. त्या निवेदनावर सरफराज काझी, आरेफ रजवी, पठाण साजिद, आरेफ रजवी, सरफराज शेख, आसेफ शेख, कुनाल जाधव, आसेफ बागवान, हनुमंत कुमटे, नेहाल माने , वसीम मनियार, इजहान पठाण, सलीम शेख, जठार बालाजी यांच्यासह अनेक नागरिकांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top