धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पु.ना. गाडगीळ शाखा धाराशिवच्या वतीने खास ग्राहकासाठी डॉ. लक्ष्मण देशपांडे लिखित सादरकर्ते मराठवाड्याचे भुमीपुत्र सिनेअभिनेते संदीप पाठक वऱ्हाड निघालंय लंडनला या एकपात्री नाटकाच्या प्रयोगादरम्यान धाराशिव जिल्हा संस्कर भारती समिती च्या वतीने मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर पु. ना.गाडगीळ शाखेस सुद्धा शाखा व्यवस्थापक अरुण को रुलकर यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी संस्कार भारती देवगिरी प्रांत चित्रकला विधाप्रमुख तथा जिल्हामार्गदर्शक कलाध्यापक शेषनाथ केशरबाई दगडोबा वाघ, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हासचिव प्रभाकर चोराखळीकर , सेवानिवृत्त न्यायाधीश रवीकुमार कुलकर्णी सांजेकर, अनुपमा बोरपळकर, विधिज्ञ रजनी कुलकर्णी, सुदर्शना वाघ, शुभम चोराखळीकर, अक्षय भन्साळी, सार्थकी वाघ, डॉ. विवेक कुलकर्णी, सत्यहरी वाघ त्याच बरोबर पु.ना. गाडगीळचे जितेंद्र जोशी, राघव गाडगीळ शाखा कर्मचारी या सत्कार प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजय गायकवाड यांनी केले.


 
Top