धाराशिव (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील बिलोली पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे धाराशिवचे सुपुत्र आनंद माळाळे यांंनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी सीआयडी चौकशी करून दोषींवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी लेखी मागणी माळाळे यांच्या कुटुंबीयांसह समाजबांधवांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

माळाळे हे मागील सहा महिन्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या मानसिक त्रासामुळे त्रस्त होते. एक महिन्यापूर्वी माळाळे यांचा अपघात झाल्याने ते वैद्यकीय रजेवर होते. या काळात वरिष्ठांनी वेळोवेळी गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी माळाळे यांच्यावर दबाव आणला. यातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी पहाटे सोलापूर येथील राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायदा व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर वंदना माळाळे, रंजना माळाळे, यशवंत माळाळे, मयूर माळाळे, राजाभाऊ ओव्हाळ, विशाल शिंगाडे, रवी माळाळे, पुष्पकांत माळाळे, सिध्दार्थ बनसोडे, संदीप बनसोडे, संग्राम बनसोडे, प्रमोद हावळे, राजाभाऊ बनसोडे, मिलींद बनसोडे, नवज्योत शिंगाडे, विद्यानंद बनसोडे, प्रमोद वाघमारे, विजय बनसोडे, आप्पासाहेब सिरसाटे, गणेश वाघमारे, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व इतरांची स्वाक्षरी आहे.


 
Top