धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यास नगर परिषद प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत आहे. शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबद्दल आज शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी वसुधा फड यांची भेट घेऊन त्यांचेशी चर्चा केली.
यावेळी मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शहरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छता वेळेवर करावी, भटके कुत्रे, डुक्कर, जनावरे लोकांच्या जिवितास धोका निर्माण करीत आहेत त्याचा बंदोबस्त करावा, भुयारी गटार गुणवत्तेबाबत चौकशी करावी, शहराती उद्यानाचे काम चालू करावे, आठवडी बाजारात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, भोगावती नदीचे स्वच्छता व सौदर्यकरण करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.येत्या आठ दिवसांत खालील मागण्यांवर सकारात्मक पाऊले न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे वरीष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, गटनेते सिद्धार्थ बनसोडे, बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, शहाजी मुंडे सर, महिला प्रदेश सचिव शिलाताई उंबरे, मूहिब शेख, प्रसिद्धी प्रमुख सरफराज काझी, जिल्हा सचिव अशोक बनसोडे, अभिषेक बागल, मिलिंद गोवर्धन, संजय गजधने, धवलसिंह लावंड, सुनील बडुरकर, विज्ञान विभागाचे अध्यक्ष अंकुश पेठे, आरिफ मुलाणी, अभिजित देडे, आतेफ काझी, सौरभ गायकवाड, सय्यद फारूक हुसेन, हज्जू शेख आदी उपस्थित होते.