परंडा (प्रतिनिधी) - उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे आयुष्मान भव कार्यक्रम माता, बालसंगोपन लसीकरण, पोषण सल्ला, तपासणी, निदान उपचार, संदर्भ सेवा,18+ आरोग्य तपासणी व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करुन कार्ड काढण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी शिबीरात सर्व रुग्णांना आयुष्यमान भव अंतर्गत मार्गदर्शन केले. माता- बालआरोग्य लसीकरण, पोषण सल्ला या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.  डॉ.अभिजित खरटमल यांनी आयुष्यमान भव कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सदरील कार्यक्रमात  माता  आरोग्य तपासणी, व्यसनमुक्ती याविषयी डॉ.आनंद मोरे यांनी पण मार्गदर्शन केले.

या शिबिरात दिपक पेठे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अश्विनी शिंदे,भूलतज्ज्ञ डॉ.अंकुश पवार,अधिपरिचारीका आऊबाई थिटे,मनिषा दुधकवडे,वाघ विक्रम, जगदाळे ज्योती,औषधनिर्माण अधिकारी अंजनी मते,ओव्हाळ सर,अधिपरिसेविका कुलकर्णी, रुपाली सौताडेकर, नागेश रनखांब, रविंद्र करपे,अनिल भोसले,मकरंद वांबुरकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी अवयवदान फॉर्म भरून घेण्यात आले. तानाजी गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले. या शिबीरात अवयवदान फार्म भरून घेण्यात आले.


 
Top