धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील ठाकरेनगर येथील नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने स्थापन केलेल्या देवीची शुक्रवारी (दि.20) रात्री जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सुविद्य पत्नी सौ. महिमा कुलकर्णी  यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. मंडळाच्या वतीने यावर्षी ठाकरेनगर व परिसरातील महिला भाविक नवरात्र उत्सवाचे संपूर्ण नियोजन करीत असल्याबद्दल सौ. कुलकर्णी यांनी मंडळाचे कौतुक केले. 

महाआरतीनंतर धाराशिव जिल्ह्यात वृक्षारोपण चळवळीसाठी विशेष योगदान जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी हे देत असल्याबद्दल सौ. महिमा कुलकर्णी यांचा मंडळाच्या वतीने महिलांच्या हस्ते तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाआरतीला उपस्थित असलेले आनंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक  रवींद्र शिंदे, ओबीसी संघटनेचे जिल्हा संयोजक धनंजय शिंगाडे यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. महाआरतीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत साळुंके यांनी नवरात्र उत्सव कालावधीत घेण्यात येत असलेल्या धार्मिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमाची माहिती दिली. महाआरती व सत्कार सोहळ्यानंतर दांडिया प्रशिक्षण घेण्यात आले. 

गेल्या 23 वर्षांपासून दरवर्षी नवरात्र उत्सवात श्रीक्षेत्र येरमाळा येथून भवानी ज्योत आणून देवीची स्थापना केली जाते. यावर्षीही हजारो महिला-पुरुष भाविकांच्या उपस्थितीत रविवारी विधिवत घटस्थापना करण्यात आली. यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व कार्यक्रमाची धुरा महिला भाविकांनी हाती घेतली आहे. घटस्थापनेपासून दररोज नित्यपूजा, सकाळी व सायंकाळी महाआरती, महाप्रसाद असे दैनंदिन कार्यक्रम नित्यनेमाने सुरू आहेत. त्याचबरोबर महिलासाठी विविध धार्मिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर, रांगोळी यासह विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उपक्रमाला ठाकरेनगर, अष्टविनायक चौक, शाहूनगर सह परिसरातील भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

यावेळी नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्ष सौ. सुरेखा नवनाथ खांडेकर, उपाध्यक्ष सौ. रुपाली रोहीत गाभणे, सौ. माया प्रशांत साळुंके, सचिव सौ. प्रतिभा अरुण गाडे, सौ. श्रद्धा उगलमुगले, सौ. रेशमा ढगे, सौ. लता राठोड, मिरवणुक प्रमुख सौ. सत्यशिला बाबासाहेब गायकवाड, सौ. दिपाली भालचंद्र चौधरी तसेच सौ. योजना सलगर, सौ. मंगल नारायण सलगर, सौ. मीना सुशील महामुनी,  सौ. कोमल प्रमोद कदम, सौ. खोत, छाया वेदपाठक सौ. लता रमाकांत इंगळे, सौ. इंदुमती मल्हारी जगताप, सौ. शितल कस्पटे, सौ. सुरेखा पवार, प्रमुख सौ. हिराबाई बंडगर, सौ. अनिता शेंडगे, सौ. विमल साठे, सौ. ज्योती ढगे, सौ. शुभांगी काळे, सौ. विमल हनुमंत माने, सौ. दिपाली चंद्रकांत गायकवाड, सौ. वैशाली बिराजदार, सौ. अनारकली शिंदे, सौ. रुक्मिणी सुरवसे, सौ. राजकन्या साळुंके, सौ. जयश्री सोनटक्के, सौ. स्वप्नाली गावकरे, सुचिता ननवरे, सौ. आशा गाते, सौ. सारिका देडे, सौ. शोभा सोकांडे, शामल साळुंके यांच्यासह महिला, पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top