धाराशिव (प्रतिनिधी)-तेरणा चालू होणार म्हणून गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. तब्बल 12 वर्षांनी तेरणाचा बॉयरल पेटला आहे. शनिवार दि. 21 ऑक्टोबर रोजी भैरवनाथ साखर समुहाचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत, व्हा. चेअरमन अनिल सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक केशव सावंत, गिरीराज व ऋषीराज सावंत या सावंत परिवारातील सदस्यांच्या हस्ते तेरणा सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर अग्नि प्रदिपन करण्यात आली.
यावेळी बोलताना प्रा. शिवाजी सावंत यांनी कारखाना चालवताना राजकारण तेरणाच्या गेटच्या बाहेर ठेवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. मुळी पुजन बाकी आहे त्यामुळे ऊसाला योग्य भाव देवू असे सावंत म्हणाले. पुढच्या पिढीचे भवितव्य घडावे यासाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. तत्कालीन संचालक मंडळाने कारखाना उभा केला. कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानी बांधली, शाळा बांधली त्याबद्दल सावंत यांनी आभारही मानले.
कार्यक्रमास उपसरपंच अमोल समुद्रे, जिल्हा प्रमुख सुरज साळुंखे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक विजय घोणसे, सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, तालुकाप्रमुख अजित लाकाळ, ॲड. अजित खोत, संग्राम देशमुख, अजित पिंगळे, राहुल वाकुरे,निहाल काझी यासह शेतकरी, सभासद, तेरणा कारखाना बचाव समितीचे सदस्य, नागरिक उपस्थित होते.