तेर (प्रतिनिधी)-बायफ संस्था व कोटक महिंद्रा बँक लि.यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव तालुक्यातील तेर, पळसप, तडवळा (क), ढोकी या गावातील दूध उत्पादक शेतकरी व पशुपालक यांच्यासाठी अल्प दरात 90 टक्के कालवडीची हमी असलेले इंजक्शेन. अल्प दरात देऊन विशेष उपक्रम राबविला जात आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत दूध उत्पादक शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने सॉर्टेड सिमेन ( 90% कालवडी होणारे इंजेक्शन), उत्कृष्ट चारा पिकांचे बियाणे वाटप , जनावरांन साठी मिनरल मिश्रण, दुध उत्पादन व व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन शिबिर, जनावरं मधील वंध्यत्व निवारण शिबिर असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये जास्तीत जास्त दुधाळ गाई तयार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. व याचा लाभ सर्व पशुपालकानी ह्यावा असे आवाहन डॉ. संतोष एकशिंगे बायफचे धाराशिवचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी डॉ . संतोष एकशिंगे यांनी केले आहे.
(शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जास्तीत जास्त दुधाळ गाई तयार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे . धाराशिव तालुक्यातील तेर येथे 50 पशुपालक यांनी यांचा लाभ घेतला आहे.हे इंजक्शेन फक्त 50 रूपयामध्ये या प्रकल्पाअंतर्गत नोंदनी केलेल्या पशुपालक यांना दिले जाते.-डॉ.अतुल मुळे, बायफचे धाराशिव जिल्हा ,प्रकल्प समन्वयक)