धाराशिव (प्रतिनिधी)- येथील प्रा.डॉ. मारुती लोंढे यांची देशाच्या सामाजिक चळवळीत कार्यरत  कर्तृत्वसंपन्न अग्रणी शिलेदारांच्या  लहुजी शक्ती सेना या लढाऊ  सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवक्ता पदी एकमताने निवड करण्यात आली. लहुजी शक्ती सेना ही संघटना बहुजन समाजाच्या शैक्षणिक,सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी  कार्य करते. या संघटनेमुळे बहुजन समाजातील अनेक मुले शिक्षणाच्या प्रवाहात आलीआहेत. बहुजनांच्या न्याय हक्कासाठी ही संघटना नेहमीच लढाऊ पद्धतीने काम करते.

लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विष्णू भाऊ कसबे, लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य डॉ. गादेकर, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्री कैलास दादा खंदारे यांच्या राष्ट्रीय व राज्य पातळीवर कार्यरत असणाऱ्या समितीने त्यांची निवड केली आहे.

या निवडीबद्दल पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष महादेव भोसले, महाराष्ट्र राज्याचे युवक प्रदेश उपाध्यक्ष रोहीत खलसे, महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, ॲड हेमंत खंदारे यांनी त्यांचे अभिनंदन केले. या निवडीबद्दल डॉ. लोंढे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.


 
Top