वाशी (प्रतिनिधी)- कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशीचे बाजारपेठ सुरु केलेल्या शेतमालाला पहिल्याच लिलावात 4950 रुपये भाव मिळाला आहे. बाजार समितीचे कामकाज सुरु होवून संचालक मंडळ यांनी बाजार आवारात लिलाव होणे करीता पुढाकार घेतला होता. लिलाव सुरु करण्याबाबत दिनांक 02/10/2023 रोजी 12.00 वा. बाजार समिती कार्यक्षेत्रातील सर्व व्यापारी वर्ग यांची बैठक घेण्यात आलेली होती. सदरील बैठकीमध्ये बाजार समितीचे परवाना बाबत चर्चा करण्यात आलेली होती त्याअनुषंगाने तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवाना बोलवुन घेवुन सदर बैठक नंतर घेण्यात यावी असे सुचविले होते त्याप्रमाणे दिनांक 10/10/2023 रोजी ठिक 11.00 वा. बैठकीचे आयोजन करुन दिनांक 24/10/2023 पासुन विजयादशमी दसऱ्याच्या मुहुर्तावर लिलाव सुरु करण्याचे ठरले होते. बैठकीत ठरल्याप्रमाणे विजयादशमी दसऱ्याच्या मुहुर्तावर लिलाव सुरु होवुन पहिल्याच दिवशी शंभर क्विंटल आवक आली होती. आजच्या लिलावात मौजे दसमेगांव येथील शेतकरी हनीफ लोहार यांच्या शेतमालाला 4950 रुपये भाव अरिहंत ट्रेंडीग कंपनीने खरेदी केला. चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्याने याबाबत समाधान व्यक्त केले आहे. यालिलावास बाजार समितीचे सभापती रणजीत गायकवाड, उपसभापती तात्यासाहेब गायकवाड, व्यापारी संचालक विकास मोळवणे, संचालक काकासाहेब मोरे, संचालक रविकर मोराळे, संचालक उध्दव साळवी, संचालक मधुकर पंडीत, संचालक अमोल कवडे, संचालक सुभाष कुरुंद, संचालक शामराव शिंदे व बाजार आवारातील सर्व व्यापारी बांधव, तालुक्यातील शेतकरी व पत्रकार बांधव उपस्थीत होते. बाजार समितीचे सचिव दत्तात्रय वाघ व कर्मचारी यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले. 

लिलावातुन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गांनी दररोज लिलाव व्हावे असे निवेदन प्रशासनाला दिले असुन प्रशासनाने संबंधीत निवेदनाप्रमाणे दररोज लिलावाचे नियोजन केले आहे. बाजार आवाराच्या बाहेर अवैध खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावर नियंत्रण करण्याकरीता बाजार समितीने धाड पथके तयार केली असुन लवकरच याबाबत कामकाज सुरु होईल. विनापरवाना खरेदी करणारांची गय करु नये असे संचालक काकासाहेब मोरे व विकास मोळवणे यांनी सुचविले.


 
Top