धाराशिव दि.30 (प्रतिनिधी) - मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सूरु केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.30 ऑक्टोबर रोजी एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे मराठा समाजाच्या अनेक वर्षापासूनच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण मागणीला न्याय देणे गरजेचे आहे. मराठा समाज, शेतकरी व जगाचा अन्नदाता आहे. तर लोकशाहीचा चौथा प्रमुख स्तंभ असलेला पत्रकार मराठा आरक्षणाच्या न्याय मागणीसाठी लेखणीच्या माध्यमातून सोबत आहे.
मराठा समाजाला तातडीने आरक्षण पत्रकारांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. त्यामुळे मराठा समाजाला तातडीने आरक्षण लागू करावे. अन्यथा शासकीय कार्यक्रम व बातम्यांवर बहिष्कार घालण्यासह तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनास ब्राह्मण कल्याण ट्रस्टच धाराशिव, महाराष्ट्रामधील सर्व शासन मान्य मुद्रांक विक्रेते, अर्ज व दस्त लेखक संघटना, अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटना, अखिल भारतीय छावा संघटना, जिल्हा विधीज्ञ मंडळ, ग्रामपंचायत कार्यालय बावी (का), राष्ट्रीय समाज पक्ष, एकता ॲटोरिक्षा चालक मालक संघटना, सोनेगाव ग्रामपंचायत व उपळा (मा) आदी संघटना व नागरिकांनी आंदोलन स्थळी येऊन पाठिंबा दिला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सरचिटणीस संतोष जाधव, धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय पाटील, मच्छिंद्र कदम, उमाजी गायकवाड, सुरेश कदम, संतोष शेटे, ऍड राजू कसबे, सुधीर पवार, प्रशांत गुंडाळे, गणेश माळी, प्रशांत मते, श्रीकृष्ण कुंभार, रणजीत मोरे, श्रीकांत कदम, शाहरुख सय्यद, शीला उंबरे-पेंढारकर, अन्सार सय्यद, दिलीप पाठक- नारीकर, सयाजी शेळके, बालाजी साळुंके, कालिदास म्हेत्रे, प्रा. अभिमान हंगरगेकर, धोंडीराम करंजकर, दिपक सावंत, धोंडीराम सोनले, संतोष मोरे, रामेश्वर डोंगरे, कलीम सय्यद, शंकर भोरे, विलास मुळीक, रविराज मंजुळे, मल्लिकार्जुन सोनवणे, सुधीर सुपनार, भीमाशंकर वाघमारे, दत्तात्रय उर्फ राजा वैद्य, बालाजी निरफळ, सुभाष कुलकर्णी, हरी खोटे, बापूराव नाईकवाडी, धनंजय पाटील, सतीश मातने, श्रीराम क्षीरसागर, उपेंद्र कटके, हुंकार बनसोडे, अल्ताफ शेख, विनोद वाकले, निजाम शेख, श्रीकांत मटकीवाला, आप्पासाहेब शिरसाठ, शीतल वाघमारे, पार्श्वनाथ बाळापुरे, पांडुरंग हजारे, दयानंद मुळे, रणजीत पिंगळे, भैरवनाथ कानडे, अमजद सय्यद, दीपक जाधव, पांडुरंग मते, सुशिलकुमार पाटील, कमलाकर कुलकर्णी, आकाश नरोटे, रहिम शेख, शहबाज शेख, आसिफ सय्यद आदींसह पत्रकार सहभागी झाले होते.