तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेचा मंदीरात रविवारी पोणिमे च्या राञी वर्षातील मानाचा छबिना संपन्न झाल्या नंतर श्रीतुळजाभवानी भवानी मातेचे मुख्य महंत तुकोजीबुवा यांनी मंदिरात जोगवा मागितला या विधीने या नवराञोत्सवाचा सांगता झाला.
रविवारी राञी सोलापूरच्या शिवलाड समाजाच्या काठ्यां समवेत पौर्णिमेचा छबिना आई राजा उदो उदोच्या गजरात काढण्यात आला. छबिना संपल्यानंतर देविचे महंत तुकोजी बुवा यांनी आपल्या उपरण्याची झोळी करुन अंबाबाईचा जोगवा या नावाने जोगवा मागितला. जोगवा विधीनंतर भाविकांनी या झोळीत जोगवा घातला. त्यानंतर महंत तुकोजी बुवात मठात फोडण्यात आलेल्या नारळांचा प्रसाद म्हणून भाविकांना खोबरे वाटप करण्यात आल्यानंतर मंदिर बंद करण्यात आले. या छबिना सोहळ्याला आरादी मानकरी भाविक मोठ्या संखेने उपस्थितीत होते.