धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

यावेळी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य डॉ.देशमुख पुढे म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. त्यांना लोहपुरुष म्हणून देखील ओळखले जाते. त्यांनी भारताची एकता आणि अखंडता यासाठी मोलाचे योगदान दिले आहे, म्हणून त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. राष्ट्र उभारणीत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने उपस्थित सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. याप्रसंगी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य बी.एस. सूर्यवंशी, कार्यालयीन प्रबंधक दिलीप लोकरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top