वाशी (प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व मराठा  आरक्षण संबंधी समाजाच्या जनजागृती साठी  सकल मराठा समाजाच्या महिलांच्या वतीने  भव्य कँडल मार्च काढण्यात आला. सोमवार  दि. 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून कँडल मार्चची  सुरूवात झाली. यावेळी शहरातील महिलांनी व तरुणींनी  मोठ्या संख्येने सहभाग घेतला. 

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेला कँडल मार्च छत्रपती शिवाजी नगर मार्ग जुनी वेस ,वर्तक चौक, लक्ष्मी रोड या मार्गे  छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप करण्यात आला.तसेच यावेळी एक मराठा लाख मराठा ,कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.


 
Top