तेर (प्रतिनिधी)- सकारात्मक बाबींसाठी जन स्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले.

धाराशिव तालुक्यातील तेर येथे 4 आक्टोबरला जनसंवाद यात्रेचे आगमन झाले. महादेव जानकर यांनी मुख रस्त्यावरून उपस्थित जनतेशी संवाद साधला तसेच श्री संत गोरोबा काका मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी रासपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अश्रूबा कोळेकर, धाराशिव तालुकाध्यक्ष सचिन देवकते, विजय वैद्य, समाधान धायगुडे, केशव सलगर, पवन माने व राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top